चिंचवडला उद्या ‘स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’

चिंचवडला उद्या ‘स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’

पिंपरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवड स्टार्ट-अप ॲंड इनक्युबेशन सेंटर (पीसीएसआयसी) तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्याच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. २२) ‘पीसीएसआयसी स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह २०२१’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सेंटरचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
शहरातील नवीन स्टार्टअपला जागतिक स्तरावर एक व्यासपीठ मिळवून देणे, हे पिंपरी-चिंचवड स्टार्ट-अप ॲंड इनक्युबेशन सेंटरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने ‘स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह’चे आयोजन केले असून बुधवारी सकाळी १० वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात उद्घाटन होणार आहे. महापौर उषा ढोरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता, सिम्बॉयोसीस युनिर्व्हसीटीच्या प्रो कुलगरु डॉ. स्वाती मुजूमदार, इन्क्युबेशन सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य आदी उपस्थित राहतील. या वेळी महिला उद्योजकता व त्यांना उपलब्ध संधी, महिला उद्योजकता वाढीसाठी एकसंध परिसंस्था निर्माण करणे, यशस्वी महिलांच्या यशोगाथा, कोविड नंतरच्या परिस्थितीवर गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, स्टार्ट-अपसाठी संभाव्य निधी उभारणीसाठी गुंतवणूकदारचे मार्गदर्शन आदी विषयांवर चर्चा होईल.

काय? कधी? केव्हा? कुठे?
काय ः स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह २०२१’
कधी ः २२ डिसेंबर, बुधवार
केव्हा ः सकाळी १० वाजता
कुठे ः ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड

इनक्युबेशन सेंटरची ओळख
महापालिकेअंतर्गत स्मार्ट सिटी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे नवउद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरची स्थापना झाली आहे. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा या क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे सेंटरचे मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. जानेवारी २०२० पासून आठ स्टार्टअप कार्यरत होते. यापूर्वी ‘फेस्टिव्हल ऑफ फ्युचर २०२०’ हा कार्यक्रम झाला आहे. १५ फेब्रुवारी २०२१ पासून १७ नवीन स्टार्टअप्स कार्यरत आहेत. आता १२ मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५ स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत आहेत. ‘इनोफेस्ट २०२१’ पासून पाच स्टार्टअप घेतले आहेत. १७ ऑगस्टपासून नव उद्योजकांसाठी सहा आठवड्यांचा कॅप्सूल कोर्स मोफत सुरू केला आहे. प्रत्येक मंगळवारी दुपारी तीन ते पाच अशी वेळ आहे. त्यात १८० पेक्षा अधिक स्टार्टअप्स सहभागी झाले आहेत. स्टार्टअप डिरेक्टरीचे नियोजन असून ५० हून अधिक स्टार्टअप डेटा गोळा करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले आहे, असेही राजेश पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com