एसटी कर्मचाऱ्यांना हवी स्वेच्छा मरणाची परवानगी

एसटी कर्मचाऱ्यांना हवी स्वेच्छा मरणाची परवानगी

तळेगाव एसटी कर्मचाऱ्यांची
स्वेच्छा मरणाची मागणी
तळेगाव स्टेशन, ता. ५ : संपावर ठाम असलेल्या तळेगाव दाभाडे एसटी आगारातील १६१ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की
एसटी महामंडळाकडून मिळणारे तुटपुंजे वेतन आणि मानसिक त्रासामुळे सुमारे ६५ एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करण्याचे विचार मनात येतात परंतु आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे, सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी लागू करून एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी तळेगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केली आहे. मावळचे तहसीलदार आर. व्ही. चाटे यांना निवेदन देतेवेळी कामगार प्रतिनिधी कैलास शेळके, साहेबराव गायकवाड, पांडुरंग बांदल, धनराज मुंडे, दिवाकर रोझतकर, बळिराम डोईफोडे, विजय चौरे, भारत कोकणे, गणेश मुंडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com