तळेगावात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

तळेगावात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

तळेगाव स्टेशन, ता. ५ : हिंदमाता भुयारी मार्गातून मुलीसोबत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील, दोन तोळे सोन्याचे सत्तर हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (ता.०४) सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. याबाबत अमिता अमलानकुमार मैती (करण अपार्टमेंट, मोहननगर, तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर भोसले करीत आहेत.
संबंधित महिला आपल्या मुलीला शिकवणी वरून पायी चालत मोहननगरकडे घरी येत होती. दरम्यान हिंदताना भुयारी मार्गावरील ओढ्याजवजवळ अंधाराचा फायदा घेऊन, एका अज्ञात इसम गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. गेल्या काही दिवसांत हिंदमाता भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. सदर ठिकाणी तळीराम आणि भुरट्या चोरांचा सतत वावर असल्याने, तळेगाव दाभाडे पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची मागणी नागरिक करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com