इंद्रायणी महाविद्यालयात ईको क्लबचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणी महाविद्यालयात
ईको क्लबचे उद्‍घाटन
इंद्रायणी महाविद्यालयात ईको क्लबचे उद्‍घाटन

इंद्रायणी महाविद्यालयात ईको क्लबचे उद्‍घाटन

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ११ : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागामार्फत नुकतेच सायन्स पोरीअम व ईको क्लबचे उद्‍घाटन केले. प्रमुख पाहुणे परेश पारेख यांनी भविष्यातील संधी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची भूमिका विशद केली. सायन्स क्लबच्या माध्यमातून विविध व्यवहार उपयोगी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी व संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांनी महाविद्यालयातील विज्ञान विभागासाठी स्वतंत्र सर्व सोयी सुविधायुक्त इमारत उभारण्यात येणार असल्याचे नियोजन सांगतानाच संस्था एका पुढच्या टप्प्याकडे विकासाची वाटचाल विस्तृत केली.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर, कर्मचारी वर्गासाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व वृक्षारोपण आयोजन केले होते. कार्यक्रमाचे विद्यार्थिनी श्रध्दा लोहार व धनश्री कारले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. विभाग प्रमुख प्रा. रोहित नागलगाव यांनी स्वागत केले. प्रकल्प प्रमुख प्रा. राखी चौडणकर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top