पुरोगामी संस्कृतीला बुद्धीची जोड हवी : दीपक चवणे
तळेगाव स्टेशन, ता. २५ : पुरोगामी महाराष्ट्रीय संस्कृतीला बुद्धीची जोड दिल्यास त्यातून कार्ये अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी व्यक्त केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ या विषयावरील कार्यशाळेचे तळेगावात आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे, न्यू समर्थ स्मार्ट स्कूलचे कार्यकारी संचालक संजय देशमुख, सुरेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेश शहा उपस्थित होते. करिअरसाठी प्लॅन तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे. पालकांनीही आपल्या मुलांसाठी वेळ द्यावा, असे आवाहन संजय देशमुख यांनी केले. संस्थेचे सचिव संतोष खांडगे प्रास्ताविक यांनी केले. आभार नंदकुमार शेलार यांनी मानले. प्रभा काळे, पांडुरंग पोटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.