आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचणी

आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचणी

महापालिका रुग्णालयांमध्ये चाचणी केंद्र सुरू

पिंपरी, ता. १ ः सध्या कोरोना बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या आठ रुग्णालयात कोरोना सदृश लक्षणे आढळून येणाऱ्या आणि तापाच्या सर्व रुग्णांची आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
शहरामधील खासगी रुग्णालयामध्ये व फिवर क्लिनिकमधून संदर्भीत केलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी महापालिकेच्या केंद्रावर मोफत स्वरूपात करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), पिंपरी-चिंचवड डॉक्टर असोसिएशन (PCDA) आणि सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वैद्यकीय विभागाने आवाहन केले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडील रुग्ण हे खालील ठिकाणी मोफत आरटीपीसीआर चाचणीसाठी करावेत अथवा त्यांचे रुग्णांचे घशातील द्रावाचा नमुना आठ झोनल रुग्णालयामार्फत कार्यरत चाचणी केंद्र येथे पाठवावेत. घशातील द्रावाचा नमुना घेणेकामी खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना साहित्य आणि सामग्री आठ झोनल रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. संदर्भीत केलेल्या रुग्णांचे आणि आरटीपीसीआर नमुन्यांची तपासणी वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालय येथील लॅबमधून करून घेण्यासाठी सर्व क्षेत्रीय रुग्णालय प्रमुखांना सूचित केले आहे, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

ही आहेत आरटीपीसीआर चाचणी केंद्र
- आकुर्डी रुग्णालय, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल,आकुर्डी, जुने आकुर्डी रुग्णालय, आकुर्डी, आरसीटीसी सेंटर शाहुनगर, साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, रुपीनगर दवाखाना, तळवडे दवाखाना, तालेरा रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड, ओजस हॉस्पिटल, पुनावळे, भोंडवे कॉर्नर, रावेत, गावडे पेट्रोल पंप, चिंचवड, जिजामाता रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, पिंपरी, नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी, पिंपळे सौदागर दवाखाना, कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, थेरगाव रुग्णालय, खिंवसरा पाटील रुग्णालय, थेरगाव, नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव, सांगवी रुग्णालय, इंदिरा गांधी प्रसूती गृह, जुनी सांगवी, बॅडमिंटन हॉल काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, भोसरी रुग्णालय
जुने भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, वायसीएम रुग्णालय, वायसीएम रुग्णालय खराळवाडी दवाखाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com