३१ डिसेंबरलाच डिजीटल व्यवहार ठप्प
थर्टी फस्टला डिजिटल व्यवहारांविना तारांबळ
नेटवर्क डाउन झाल्याने ग्राहकांची पंचाईत; रोखीच्या व्यवहारामुळे उडाला गोंधळ
पिंपरी, ता. १ : नवीन वर्षाची सुरुवात अन् सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकांचे विविध प्रकारचे प्लॅनिंग सुरू होते. कोणी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तर कोणी पर्यटनाच्या ठिकाणी तर आणखी कोणी खरेदी करण्यामध्ये गुंतले होते. अशा परिस्थितीत ३१ डिसेंबरला रात्री आठपासून अचानक डिजिटल व्यवहार ठप्प झाले. मध्यरात्री एकपर्यंत चार ते पाच तासांत अनेकांची दाणादाण उडाली.
डिजिटलच्या जमान्यात अनेकांनी किरकोळ रक्कम खिशात सुरू ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पेटीएम, गुगल पे, फोन पे, भीम ॲपसह विविध ॲप नागरिकांच्या मोबाइलमध्ये आहेत. बॅंकाचेही ॲप असल्याने थेट मोबाइलनंबरवर पैसे जमा करण्याची सोय झाली आहे. स्कॅनर कोडवरही एका क्लिकवर पैसे जमा होत असल्याने अनेकांना ते सोयीचे पडत आहे. बरेचदा युवा वर्ग आता रोखीने पैसा वापरत नाही. त्यामुळे तरुणाईसह सर्वांचा कल डिजिटल पेमेंटकडे आहे. अशावेळी ३१ डिसेंबरला सर्वांना एटीएम शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. बरेच जण ग्रामीण भागात तसेच गावी नवीन वर्ष सेलिब्रेट करत होते. त्यामुळे शहरापासून दूर असलेल्यांचीही पंचाईत झाली.
नेटवर्क डाउन असल्याने कोड स्कॅन झाला नाही. बऱ्याच जणांनी चार ते पाच वेळा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. अनेकजण हॉटेलबाहेर पैसे भरण्यासाठी ताटकळत उभे राहिले. अनेक मालकांची पंचाईत झाली. एका स्वाइप मशिनवर पैसा नेमका कसा स्वीकारावा हे समजेनासे झाले. अनेकजणांनी एटीएम देखील सोबत ठेवले नव्हते. त्यामुळे मालकांसहित ग्राहकांची धावपळ उडाली.
‘‘घरी कुटुंबासोबत सर्वजण बिर्याणीचा आनंद घेणार होतो. आधीच भोसरीतील हॉटेलमध्ये गर्दी असल्याने वैतागलो होतो. पार्सल हातात मिळाले. त्यानंतर ॲपवरुन व्यवहार झाला नाही. अर्धातास प्रयत्न केला. शेवटी, बिर्याणी हॉटेलमध्ये तशीच ठेवली. पैसे काढण्यासाठी एटीएमला गेलो.’’
- लोकेश, भोसरी
‘‘चिंचवडच्या मॉलमध्ये खरेदी करीत होतो. सहा हजारांच्या आसपास बिल झाले. नेटवर्क कदाचित डाउन होते. त्यामुळे एक तास भर ताटकळत उभा राहिलो. कार्ड स्कॅन करण्यासाठी मोजक्या मशीन होत्या. त्यामुळे काउंटर बदलावे लागले.’’
- मृणाल, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.