थेरगावात बीआरटीमध्ये बेशिस्त वाहने सुसाट

थेरगावात बीआरटीमध्ये बेशिस्त वाहने सुसाट

पिंपरी, ता. १ : थेरगाव बीआरटीमध्ये वाहने सुसाट धावत असून सुरक्षारक्षक नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. चारचाकीसह दुचाकी बीआरटीतून जात असल्याने पीएमपीएलच्या बस बीआरटीतून न जाता सेवा रस्त्याने जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
लॉकडाउनच्या आधीपासून सुरक्षारक्षकांचा या ठिकाणी पत्ताच नसल्याने या बीआरटी मार्गाला कोणी वालीच उरला नाही. काळेवाडी ते रावेत मार्गावर या ठिकाणांहून बस धावत असतात. ही वाहने धावताना रात्रीच्या वेळी बीआरटीच्या आतमध्ये नागरिक देखील थांबलेले असतात. अनेकजण शतपावली आणि मॉर्निंग वॉक करण्यासाठी बीआरटी मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे, बीआरटी थांबा केवळ शोभेसाठी उरला असल्याचे दिसत आहे. परिणामी, सेवा रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. वाहतूक कोंडी नियमित होत आहे.
तसेच, नागरिकही जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहत बसलेले असतात. खासगी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बीआरटीमधून हटत नाही.पीएमपी बसला जाण्यासाठी जागाच उरत नसल्याने पीएमपी सेवा रस्त्यावरून धावत आहे. केवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पीएमपीच्या नियमांचे पालन होताना दिसत आहे. त्याव्यतिक्ति इतर बीआरटी मार्ग बेवारसपणे पडले आहेत. वाहनधारकांना दंड ठोठावून आणि शिस्तीचे धडे देवूनही वाहनचालक सुसाट धावत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com