ऑनलाईन फसवणुकीद्वारे गेलेले पैसे तक्रारदारांना परत मिळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन फसवणुकीद्वारे गेलेले पैसे तक्रारदारांना परत मिळाले
ऑनलाईन फसवणुकीद्वारे गेलेले पैसे तक्रारदारांना परत मिळाले

ऑनलाईन फसवणुकीद्वारे गेलेले पैसे तक्रारदारांना परत मिळाले

sakal_logo
By

ऑनलाईन फसवणुकीद्वारे
गेलेले पैसे मिळाले परत
बारा तक्रारदारांना साडे दहा लाख रुपये प्रदान
पिंपरी, ता. १ : वाकड पोलिसांनी केलेल्या कसून तपासामुळे ऑनलाइन फसवणुकीद्वारे गेलेले पैसे तक्रारदारांना परत मिळाले. मागील सहा महिन्याच्या वेगवेगळ्या घटनेतील बारा तक्रारदारांना त्यांचे पैसे परत मिळाले. ही रक्कम साडे दहा लाख रुपये आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भामटे या माध्यमातून सामान्य नागरिकांना गंडा घालत आहेत. दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
वाकड पोलिसांनी एक पथक तयार करून, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची तत्काळ दाखल घेत त्यावर कारवाई करण्यास सुरवात केली. स्वतंत्र सायबर सेल स्थापन करीत सायबर गुन्हे कार्यप्रणालीत तज्ज्ञ असलेले कौंतेय खराडे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून चोरांवर लक्ष केंद्रित केले. ऑनलाईन गंडा घालून गेलेली रक्कम इ कॉमर्स, पेटीएम, फ्लिपकार्ट, अमेझॉन यांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून ती रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा केली. अशा प्रकारे मागील सहा महिन्यांत फसवणूक झालेल्या रकमेपैकी दहा लाख ८० हजार १४१ रुपयांची रक्कम बारा तक्रारदारांना वाकड पोलिसांनी परत मिळवून दिली.
--------------

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top