किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप
किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप

किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप

sakal_logo
By

नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत
देशभरातून बाराशे खेळाडू

पिंपरी, ता. ३ ः पुणे येथे २७ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजित कॅडेट्स ज्युनिअर आणि सीनियर वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप यशस्वीरीत्या पार पडल्या. संपूर्ण भारतातून २६ राज्यांमधून १२०० खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे डीसीपी मंचक इप्पर, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बारणे, वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कल्याण, सीनिअर उपाध्यक्ष वासिम अहमद, आनंद बाळू फेडरेशनचे यांच्या हस्ते पार पडला. बक्षीस वितरण नगरसेवक कुंदन गायकवाड, देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उद्योजक शिवाजी बारणे, युवा नेते सुनील लांडे पाटील, संदीप शेलार महाराज, बजरंग दल प्रमुख नाना सावंत, उद्योजक सागर रेवाळे यांच्या हस्ते झाले. पुणे किकबॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल टीम कमांडो इंडिया, आर्यन्स मार्शल आर्टचे सर्व प्रशिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वाको इंडियाचे महासचिव संतोष म्हात्रे यांनी नियोजन केले.


निकाल पुढीलप्रमाणे ः या प्रथम द्वितीय व तृतीय विजेतेपद मिळवणारे राज्य
कॅडेट्स श्रेणी
पहिले स्थान - महाराष्ट्र,
दुसरे स्थान - कर्नाटक
तिसरे स्थान - मणिपूर

कनिष्ठ श्रेणी
पहिले स्थान - महाराष्ट्र
दुसरे स्थान - कर्नाटक
तिसरे स्थान - राजस्थान

वरिष्ठ श्रेणी
पहिले स्थान- महाराष्ट्र
दुसरे स्थान - कर्नाटक
तिसरे स्थान - मणिपूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top