दोन महिन्यात सुमारे ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न बुडाले पहिल्या नव्या पगाराची अद्याप प्रतीक्षाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन महिन्यात सुमारे ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न बुडाले

पहिल्या नव्या पगाराची अद्याप प्रतीक्षाच
दोन महिन्यात सुमारे ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न बुडाले पहिल्या नव्या पगाराची अद्याप प्रतीक्षाच

दोन महिन्यात सुमारे ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न बुडाले पहिल्या नव्या पगाराची अद्याप प्रतीक्षाच

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः एसटी महामंडळाचे वल्लभनगर आगार व दापोडी कार्यशाळेत एकूण कर्मचारी २१३ असून त्यापैकी तब्बल १८१ कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे संपामुळे दोन महिन्यात सुमारे ३ कोटी ६० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. संपात चालक, वाहकसोबतच वर्कशॉप, टायर रिमोल्डींग कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे आगारामधील २४ कर्मचारी निलंबित झाले आहेत. चालक, वाहकांसोबतच वर्कशॉप, टायर रिमोल्डींग कर्मचाऱ्यांचाही सहभाग आह़े

स्थानकावर ७० बस थांबून
या आगारातील कोल्हापूर, पणजी, हैदराबाद, गंगापूर, बिजापूर, कोकण, बेळगाव, बिजापूर, तिवरे, दापोली, महाड, उमरगा या विविध मार्गावरील ७० बस बंद आहेत. त्यामुळे दररोज मिळणाऱ्या सुमारे साडेआठ लाखाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. महामंडळाचे सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संपात सर्व कामगार सहभागी झाल्याने अजून एकही बस बाहेर जात नसल्याने डेपो पूर्ण बंद असल्याने आगारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. गाड्यांची देखभाल, दुरुस्ती यामध्ये महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या वर्कशॉपमधील कामकाज ठप्प आहे. केवळ दोन कर्मचारी कार्यशाळेत आहेत. वाहनांचा मेंटेनन्स पाहत आहेत.

एकूण आगारातील सद्यस्थिती
प्रवर्ग - हजेरीपटावरील कर्मचाऱ्यांची संख्या - प्रत्यक्ष संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या
प्रशासकीय -२६ - ७
कार्यशाळा -३२ -२८
चालक -६८ - ६६
वाहक -८७ - ८०
एकूण संख्या - २१३ - १८१

कोट
राज्यात विविध आगारात सुमारे ३७ कर्मचाऱ्यांचे आर्थिक विवंचनेतून मृत्यू झालेत. तरीही राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य शासन यांना महामंडळाच्या वेतनाचा प्रश्‍न सोडवता येत नाही. अनेकवेळा निवेदने, आंदोलने करूनही कर्मचारी संघटनांच्या तोंडांना पाने पुसण्याचेच काम राज्य शासनाने केले आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यत संपावर ठाम आहोत.
-प्रवीण मोहिते, कर्मचारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top