क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली*

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली*

सावित्रीबाई फुले यांना विविध उपक्रमाद्वारे अभिवादन
क्रीडा प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, एकपात्री कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, ता.३ ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी त्यांना अभिवादन केले. पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टीच्यावतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी गरजू नागरिकांसाठी ई-श्रम कार्डचे वाटप केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ननावरे, आपचे संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन जाधव, रमेश ठोंबरे यांच्या हस्ते ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले. नारायण भोसले, मोहन जाधव, अविनाश नवसारे, शिंदे साहेब, मनाली काळभोर उपस्थित होते.
निगडी प्राधिकरणमधील अभिमान इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये ‘बालिका दिवस'' साजरा केला. तीन भाषांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, सामाजिक कार्य तसेच शिक्षणाचे महत्त्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या भाषणातून दिले. वालचंद संचेती यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांच्याकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चिंचवड स्टेशन येथील सी. के. गोयल विद्यालयात ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान लेकीचा’ अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेतला. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, डॉ. अपर्णा बागले, विजय जाधव, प्राथमिक उपमुख्याध्यापक बाळू महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मी सावित्री बोलते’ (मनीषा चिखले), ‘मी जिजाऊ बोलते’ (ज्योती जॉन) डॉ. आनंदीबाई जोशी( स्नेहल परदेशी) एक पात्री प्रयोग, कवितेतून व भाषणातून उजाळा दिला. माध्यमिक मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रेय भालेराव, शरद पटेल उपस्थित होते. संयोजन पुष्पा शिंदे, नीता खैरे, वर्षा भिटे, सारिका आदमाने, दिलशाद मुलानी, भाऊसाहेब पगार, अनिल मुटकुळे व देवरे अशोक यांनी केले.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या रसिकलाल एम धारिवाल औषध निर्माण शास्र पदवी महाविद्यालय चिंचवड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
चिखलीतील श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालयात विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिपयोगाही सादर केला. मानवी मनोरे, सूर्यनमस्कार, कवायत असे विविध प्रकार सादर केले. यावेळी लायन्स क्लबचे प्रदीप कुलकर्णी, श्री देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक गौतम इंगळे यांनी केले. वैशाली नरवडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्माराम बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अभिव्यक्ती, पुणे शहर महिला कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र), स्वाधार महिला पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, वारसा सोशल फाऊंडेशन, मैत्रीण महिला मंच अशा विविध संस्था संघटनांनी सावित्रीबाईच्या स्मृतीला सत्यशोधक विचारांच्या लेकींनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे अभिवादन केले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांनी स्त्री सक्षम बनवण्यासाठीचा अजून लढा द्यायची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मंगल निकम, वर्षा सपकाळ, गीता अंजली, नीलिमा घरत, राजश्री भोसले, रिना, अंगणवाडीच्या राजश्री कालेकर या लेकींनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, मोहन जोशी, पूजा आनंद, अलका जोशी, सुनंदा साळवी, प्राची दुधाणे, अर्चना शहाही उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर, रुपीनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक केले. एकपात्री नाटक सादर केले. अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, खजिनदार बाळासाहेब सावंत, नीलकंठ लांडगे, अरविंद वायकोली, डॉ. वर्षां सदाफुले, काळूराम वाळके, मुख्याध्यापक राहुल गवळी, मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे उपस्थित होते.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत बालिका दिन साजरा केला. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या कल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात आले. आर्या बिरजे या विद्यार्थिनीने त्यांच्या जीवनावरील कविता सादर केली. शिक्षिका सुजाता बनसोडे यांनी ‘मी सावित्रीबाई बोलते....’ ही नाट्यछटा सादर केली. पुष्पा राऊत यांनी सावित्रीबाई फुले यांची मुलांना माहिती सांगितली. सूत्रसंचालन सुरेखा भामरे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी
मार्गदर्शन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापिका शारदा शेटे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण केली. संगीता धादवड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची महती व्यक्त केली. यानंतर विद्यार्थिनी अंजली सुरडकर, वैष्णवी थोरात , सोनम हतरगे यांनी अविरत श्रम याविषयी माहिती सांगितली. गीतांजली नागरे ओवी सादर केली. सूत्रसंचालन मीनल साकोरे यांनी केले. अनघा रांगणेकर यांनी आभार मानले.
फोटो ः 3282

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com