पोलिस ठाण्याच्या काचा फोडून वाहने जाळली

पोलिस ठाण्याच्या काचा फोडून वाहने जाळली

पिंपरी, ता. ४ : पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या काचा व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून ठाण्यातील चार वाहने जाळली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली पोलिस ठाणे येथे घडला.
निखिल दत्तात्रेय कंगने (वय २२, रा. फिरस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेखा महादेव गायकवाड (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिरस्ता आहे. तर फिर्यादी या चिखली ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. फिर्यादी या ३१ डिसेंबरला रात्री ड्यूटीवर येत असताना, आरोपीने त्यांना ठाण्याच्या जिन्यात अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर फिर्यादीसह इतर पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर २ जानेवारीला मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपीने पोलिस ठाण्याच्या तळमजल्यातील पार्किंगमधील फिर्यादी यांची एक दुचाकी व गुन्ह्यात जप्त केलेली इतर तीन वाहने पेटवून दिली. तसेच काही वाहनांचे कुशन फाडून पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर दगड मारून पोलिस ठाण्याच्या दोन खिडक्यांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com