जाहीरात विभागाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहीरात विभागाची बातमी
जाहीरात विभागाची बातमी

जाहीरात विभागाची बातमी

sakal_logo
By

उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सावित्रींच्या लेकीं’चा गौरव

पिंपरी-चिंचवड महात्मा फुले मंडळाच्या वतीने चिंचवडमध्ये २२ महिलांना पुरस्कार

पिंपरी, ता. ५ ः ‘‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्याबाबत संसदेत मागणी केली असून, आगामी काळात त्याबाबत पाठपुरावा करू,’’ असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे केले.
पिंपरी-चिंचवड महात्मा फुले मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या २२ महिलांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी बारणे बोलत होते. यावेळी महापौर उषा ढोरे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र शिंदे, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. या वेळी सावित्रीबाई फुले प्रशासन भूषण पुरस्काराने साईबाबा शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बागायत यांना सन्मानित करण्यात आले. तर शीतल वर्णेकर (शिक्षण), आरिफा मुलाणी (सावित्री फातिमा पुरस्कार), सोनाली सातव (वैद्यकीय) सखूबाई राऊत (आदर्श माता), माधुरी आल्हाट (वैद्यकीय), संगीता जोशी-काळभोर (समाजसेवा), सीमा तरस (समाजसेवा) वैष्णवी जगताप (क्रीडा), माधुरी कोराड (पत्रकार), विद्याताई काशीद (समाजसेवा), नंदाताई आल्हाट (अध्यात्म), राजश्री लांघी (कर्तव्यदक्ष पोलिस), सुरेखा देशमुख (कर्तव्यदक्ष पोलिस), मनिषा मेटे (नर्सिंग), अरुणा माळी (नर्सिंग), कविता खराडे, समाजसेवा), पौर्णिमा कोल्हे (समाजसेवा), आशाताई बागडे (आदर्श शिक्षिका), सुहासिनी लांडगे (कायदा), रेणुका गोपीनाथ (उद्योग), अनुषा पै (समाजसेवा) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कल्याणराव आखाडे म्हणाले, ‘‘रजिस्टर मंडळे मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. पण खऱ्या अर्थाने समाजाभिमुख कार्य करणारी मोजकी मंडळे असतात. त्यामध्ये फुले मंडळाचा समावेश आहे.’’
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी केले. स्वागत अपर्णा डोके यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण यांनी केले. तर आभार महादेव भुजबळ यांनी मानले. अनिल साळुंके, सूर्यकांत ताम्हाणे, नरहरी शेवते, विश्वास राऊत, अमर ताजणे यांनी नियोजन केले.

‘‘मी आज या पदावर आहे, ती केवळ सावित्रीबाईंचे देणे आहे. त्यांनी शिक्षणाचा पाया रोवला नसता तर मी या पदापर्यंत पोचूच शकले नसते.’’
- भाग्यश्री बागायत, सीईओ, साईबाबा शिर्डी संस्थान

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top