चित्रकला स्पर्धेत प्रतिक्षा लोखंडे प्रथम

चित्रकला स्पर्धेत प्रतिक्षा लोखंडे प्रथम

पिंपरी, ता. ५ ः स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया(एस एफ आय) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया( डी वाय एफ आय) यांच्यावतीने चिखली घरकुल येथे, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ५५ मुलांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख वक्त्या ॲड. मनीषा महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मार्गर्शन केले. शिक्षणामध्ये मुलगा-मुलगी असा लिंगभेद केला जातो. त्यामुळे कुटुंबातील मुलींना शिक्षणाची समान संधी आजही दिली जात नाही. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकतो, शिकून आपली प्रगती करू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेत प्रतिक्षा गोकूळ लोखंडे - प्रथम, राज अशोक सोनवणे - द्वितीय, निमिष विनोद सकपाळ - तृतीय क्रमांक पटकावला. तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. भार्गवी लाटकर, शिवराज अवलोळ, दिव्या चव्हाण, तन्मय गिरी, प्रशांत सुरवसे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, अपर्णा दराडे, रंजिता लाटकर, अविनाश लाटकर, सचिन देसाई, सेंट्रल कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, राज्य कमिटी सदस्य विलास साबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com