देहू ः मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू ः मंदिर
देहू ः मंदिर

देहू ः मंदिर

sakal_logo
By

संत तुकाराम महाराज
शिळा मंदिराचे काम पूर्ण

देहू, ता. ५ ः देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. या शिळा मंदिरात संत तुकाराम महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापणा व सुवर्ण कलशारोहण समारंभ संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनी करण्यात येणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी दिली.
देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने सुमारे एक कोटी १७ लाख रुपये खर्च करून संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे संपूर्ण दगडामध्ये काम करण्यात आले आहे. या मंदिरातील आतील बाजूस चांदीच्या महिरप आणि मखरचे काम सुरु आहे.
याबाबत संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले, की सध्या शिळा मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. आतील बाजूस ७० किलो चांदी वापरून, मखरीचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच साधारणपणे अर्धा किलो सोने वापरून दोन कलश बनविण्यात येणार आहे. पुणे येथील रांका ज्वेलर्सकडे सध्या काम सुरु आहे. अकलूज येथील विजयश्री पाटील, सुशांत आणि निशांत पाटील यांच्यावतीने कलश देण्यात येणार आहे. तसेच चांदीच्या मखरीसाठी चिखलीतील ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी पाच किलो चांदी दिली आहे. उर्वरित कामासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात वसंत पंचमीला म्हणजे ५ फेब्रुवारीला संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापणा व कलशारोहण करण्यात येणार आहे.
फोटो ः ३३४४५

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top