‘ती’ सेल्फी शेवटची ठरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’ सेल्फी शेवटची ठरली
‘ती’ सेल्फी शेवटची ठरली

‘ती’ सेल्फी शेवटची ठरली

sakal_logo
By

कामशेत, ता. २ ः मुंबईहून फिरायला आलेल्या तरुणीचा पुणे-मुंबई महामार्गावर मनशक्तीजवळ अपघातात मृत्यू झाला. तिचा भावी जोडीदार जखमी झाला. अंकिता अभय गावडे (वय २४, रा. शिवडी, मुंबई) असे तरुणीचे नाव आहे. ती जीम ट्रेनर होती. तिचा भावी जोडीदार आदिनाथ सुरेश वारसे (वय २४, रा. शिवडी) याच्या सोबत ती दुचाकीने लोणावळा, कार्ला परिसरात फिरायला आली होती. दोघांनी एकवीरा गडावर दर्शन घेऊन परत जाताना त्यांचा अपघात झाला. महामार्गावर ती अर्धातास पडून होती. आदिनाथ किरकोळ जखमी झाला आहे. कुसगावचे माजी सरपंच काळूराम लालगुडे यांनी तिला उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, गडावर सेल्फी घेताना त्यांना अनेकांनी पाहिले होते. ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची सेल्फी ठरल्याची चर्चा उपस्थितांत ऐकायला मिळाली.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top