सर्वसामान्यांनी जगायचे कसं?

सर्वसामान्यांनी जगायचे कसं?

कामशेत, ता. २ ः कोरोनाच्या काळात हातच काम गेले. त्यातच लेकीचे लग्न ठरले. लग्नाच्या खर्चात शिल्लकीची रक्कम खर्ची झाली. हाताला कामही नव्हते, महागाई बोकांटी बसली. अजून सावरलो नाही तोच तिसऱ्या लाटेची धाकधुक वाढली. आमच्या सारख्या सर्वसामान्यांनी जगायचे कसं अशी खंत जवण वसाहत क्रमांक तीन येथील गृहिणी विद्या मालपोटे यांनी व्यक्त केली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली आहे.
कोरोनाच्या संकटातून अद्यापही सर्वसामान्य गृहिणी सावरल्या नाहीत. त्यात वाढत्या महागाईने त्या मेटाकुटीला आल्या आहेत. किराणा, भाजीपाला, इंधन, सिलेंडर, कपडे, औषधोपचार, मुलांच्या शैक्षणिक फीचा तगादा यावर गृहिणींनी खंत व्यक्त केली. वाढत्या महागाईत होरपळत असलेल्या गृहिणीनी आपली कैफियत मांडली. शहरात रोजगाराच्या संधी आहेत. आम्ही खेड्यापाड्यातील महिला कामासाठी शहरात यावे लागते. हाताला मिळेल ते काम आम्ही करतो. कोणी घरकाम करते तर कोणी मोलमजुरी हे करून गृहिणीची आपली जबाबदारी त्या पार पाडत आहे. रोजच्या रोज चुलीवर काय शिधा रांदायचा आणि मुलांचे संगोपन कसे करायचे ही रोजची चिंता आहे. ती पार पाडताना काटकसर याचीची आम्हाला सवय झाली असल्याचे आर्डवच्या प्रमिला आडकर यांनी सागितले.

गृहिणी म्हणतात...
साहेरा शेख (कामशेत) ः महागाई वाढली, गरिबांनी काय खायचे आणि कसे रहायचे? बारा वर्षे नोकरी केली, तीही गेली. आता हाताला मिळेल ते काम करते.
आशा घारे (कांब्रे) ः कामाला जायचे तर एसटी बस नाही. खासगी वाहनातून अधिक भाडे देऊन जावे लागते. एसटी बस सुरू व्हावी.
वनिता लाडके (कान्हे) ः सिलेंडरच्या किमती वाढल्या. त्यात घरभाडे दिवसेंदिवस वाढत आहे. घर खर्चाच्या बरोबरीने दवाखान्याचा खर्च वाढत आहे.
मनीषा घाटविसावे (करंजगाव) ः महागाईत मुलांना शिकवायचे कसे? ऑनलाईन शिक्षणासाठी महागडे मोबाईल आणि त्याला रिचार्ज कसे मारायचे ही समस्या आहे.
मनीषा मोधळे (अनसुटे) ः खाजगी कंपनीतील काम गेले. आता हाताला मिळेल ते काम करते, दोन मुलांचे शिक्षण आणि घरभाडे देताना काटकसरीने रहावे लागते.
बायडाबाई कटके (नाणे) ः वाढलेली महागाईने काटकसर करून राहतो. रेशनिंगचे धान्य मिळते याचा आधार आहे.
शुभांगी शिंदे (साते) ः महागाई कमी होणार नाही, हे शाश्वत सत्य असल्याने महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com