मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी आ.लक्ष्मण जगताप यांची राष्ट्रपतींना पोस्टकार्ड मोहीम-

मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यासाठी आ.लक्ष्मण जगताप यांची राष्ट्रपतींना पोस्टकार्ड मोहीम-

मराठीच्या अभिजात दर्जासाठी
आमदार जगताप यांचे पत्र

जुनी सांगवी, ता. ३ ः भारत सरकारने २००४ मध्ये भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात यावा, याबाबत चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोस्टकार्डाद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. त्यास आता सात वर्षे उलटून गेली. ही शिफारस ताबडतोब अमलात येणे गरजेचे आहे. मराठी ही प्राचीन भाषा असून, ती राजभाषा ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधील अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे शाबीत होते की मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com