पदरेशातील मराठी मुलांसाठी
कविता सादरीकरण स्पर्धा

पदरेशातील मराठी मुलांसाठी कविता सादरीकरण स्पर्धा

Published on

पुणे, ता. २४ : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे, हेरिटेज’तर्फे परदेशातील मराठी मुलांसाठी कविता सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘बालसाहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका शकुंतला फडणीस यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. बारा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्क आहे. यात मुलांनी आपल्या आवडीची कुठलीही मराठी कविता पाठ करून ती सादर करायची असून त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी लीना गोगटे (मोबाईल क्रमांक ९८२३२५६६६२) किंवा अविनाश ओगले (९३७३७६४२४७) यांच्याशी संपर्क साधावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com