विविध क्षेत्रात योगदान 
करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

विविध क्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

जुनी सांगवी, ता. १४ ः ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स बानाई यांच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या, उल्लेखनीय कार्य व पदोन्नत शासकीय सेवेतील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव जी. एम. कंधारे उपस्थित होते. संशोधन अधिकारी यशदा डॉ. बबन जोगदंड, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्वेअरचे सीईओ राहुल जाधव, धम्मज्योती गजभिये महासंचालक, बार्टी, मिलिंद जीवाने मुख्य अभियंता, यांत्रिकी जलसंपदा विभाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान, विविध शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी प्रास्ताविक केले. ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बनसोडे यांनी आभार मानले. कैलास बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com