उघड्या दरवाजावाटे घरात शिरून लॅपटॉप, मोबाईल चोरीला

उघड्या दरवाजावाटे घरात शिरून लॅपटॉप, मोबाईल चोरीला

पिंपरी, ता. ६ : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने तीन लॅपटॉप व तीन मोबाईल चोरले. हा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सुयश दत्तात्रेय मारडकर (रा. हिंदवी कॉलनी, आळंदी देवाची ) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी व साक्षीदार यांचे घर उघडे होते. त्यावेळी उघड्या दरवाजावाटे चोरटा घरात शिरला. फिर्यादी व साक्षीदार यांच्या घरातून ९५ हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप व तीन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com