पूर्ण झालेले ‘स्मार्ट’ प्रकल्प हस्तांतरीत करा संचालक तथा महापौर उषा ढोरे यांची सूचना; संचालक मंडळाकडून कामांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्ण झालेले ‘स्मार्ट’ प्रकल्प हस्तांतरीत करा

संचालक तथा महापौर उषा ढोरे यांची सूचना; संचालक मंडळाकडून कामांची पाहणी
पूर्ण झालेले ‘स्मार्ट’ प्रकल्प हस्तांतरीत करा संचालक तथा महापौर उषा ढोरे यांची सूचना; संचालक मंडळाकडून कामांची पाहणी

पूर्ण झालेले ‘स्मार्ट’ प्रकल्प हस्तांतरीत करा संचालक तथा महापौर उषा ढोरे यांची सूचना; संचालक मंडळाकडून कामांची पाहणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी काही पूर्ण तर अनेक प्रकल्प पूर्णत्वास आहेत. हे प्रकल्प नागरिकांसाठी खुले करून देण्यासाठी त्यांची उर्वरित कामे पूर्ण करून, ते महापालिकेच्या संबंध‍ित विभागांकडे हस्तांतरित करा, अशा सूचना स्मार्ट सिटीच्या संचालक तथा महापौर उषा ढोरे यांनी केल्या.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पांतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात सुरू असलेल्या एबीडी (एरिया बेस डेव्हलपमेंट) व पॅन सिटी प्रकल्पांअंतर्गत कामांची संचालक मंडळाने पाहणी केली. त्यादरम्यान महापौर बोलत होत्या. संचालक तथा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, शहर अभियंता तथा सहमुख्य कार्यकारी अध‍िकारी (एबीडी) राजन पाटील, सहशहर अभियंता तथा जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, सहायक मुख्य कार्यकारी अध‍िकारी लक्ष्मीकांत कोल्हे, शिर्के कंट्रक्शनचे मॅनेजर नितीन कदम आदी उपस्थ‍ित होते. शहर अभियंता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथील संपूर्ण एबीडी प्रकल्पांचे सादरीकरण झाले. यात विकास कामांची प्रगती, प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी, त्यासाठी उपलब्ध निधी यासंदर्भात चर्चा करून उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करणे व प्रस्तावित कामांबाबत चर्चा झाली.

अशी आहेत स्मार्ट कामे
पिंपळे गुरव येथील जिजामाता उद्यान व परिसरातील रस्ते, चौकांमध्ये सुरू असलेली कामे, कृष्ण विहार चौक येथील आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तयार केलेले प्लेस मेकिंग, चिल्ड्रेन प्ले एरिया, सुदर्शन चौकातील सेव्हन स्टार रोड, योगा पार्क, बीआरटी रोड, कोकणे चौकातील रस्ते, टॉयलेट ब्लॉक, पदपथ; रहाटणी चौकात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

स्मार्ट सिटी संचालकांच्या सूचना
- सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके ः फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपूर्ण कामे नागरिकांसाठी खुली करायला हवी. त्यानुसार कामांचा वेग वाढवा. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. प्रकल्पांतर्गत रस्त्यांना जागेची अडचण असल्यास स्थानिक नगर सदस्यांच्या मदतीने प्रश्न सोडवून स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा.
- नगरसेवक सचिन चिखले ः रस्त्यांवर अतिक्रमण होत आहेत. खासगी केबल चालकांकडून पथदिव्यांच्या खांबांचा उपयोग केबल टाकण्यासाठी केला जात आहे. महापालिकेच्या मदतीने हे सर्व अतिक्रमण काढण्यास कार्यवाही करावी. विकास कामांच्या शिल्लक निधीतून नवीन कामे हाती घेण्यात यावीत.
---

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top