पिंपरी चिंचवड शहरात कोरोना काळात ९१०० हजार कोटीच्या घरांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना काळात ९१०० हजार कोटीच्या घरांची विक्री

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना काळात ९१०० हजार कोटीच्या घरांची विक्री

‘वर्क फ्रॉम होम कल्चर’ आणि ‘डिजिटलायझेशनच्या’ जमान्याचा विचार करून घरांची (Home) निर्मिती होत आहे. घरांच्या विक्रीचा उच्चांक कोरोना काळात (Corona Period) पिंपरी-चिंचवड शहराने (Pimpri Chinchwad City) गाठला आहे. औद्योगिक नगरीसोबतच निवासी क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे बांधकाम क्षेत्रातही (Construction Field) मोठी उलाढाल होत आहे. सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या मेट्रो सिटीमध्ये बांधकाम क्षेत्रात (रिअल इस्टेट) (Real Estate) झालेली उलाढाल व घरांच्या विक्रीच्या माहितीचा आढावा देणारी ही मालिका...

पिंपरी - कोरोना काळात व त्यानंतरही हक्काच्या घरांना मागणी वाढली आहे. सर्वाधिक गुंतवणूक बांधकाम क्षेत्रात झाली आहे. औद्योगिक नगरीत कोरोना कालावधीत सर्व क्षेत्रांमध्ये उलाढाल ठप्प झाली. परंतु, घरांची मागणी घटलेली नाही. ‘सीआरई मॅट्रिक्स’ व ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ या कंपनीच्या अहवालानुसार दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरात अंदाजे दहा हजार कोटी किमतींच्या घरांची विक्री होते. २०२० व २०२१ या कोरोना कालावधीत ती झाली आहे. परंतु, जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत ९,१०० कोटी उलाढालीचा उच्चांक शहरात गाठला आहे.

हेही वाचा: पिंपरी शहरात ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण आढळले

सणाचा कालावधी सोडून आर्थिक वर्ष संपण्यास चार महिने शिल्लक आहेत. तरीही मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक विक्री २०२१ मध्ये झाली. मुख्यत्वे, हा सर्व कोरोना काळ व लॉकडाउन कालावधीनंतर या क्षेत्रात मध्ये सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. ७५ लाखांच्या आतील किमतीच्या घरांची ८० टक्के विक्री झाली. त्यामध्ये, २५ ते ५० लाख आणि ५० ते ७५ लाखापर्यंतची घरे सर्वाधिक होती. पाच वर्षांपासून हाच ट्रेंड कायम राहिल्याचे अहवालावरून समोर आले आहे.

शहरात २०१७ मध्ये केवळ १६ हजार ९८३ घरांची विक्री झाली. त्यानंतर ती वाढत गेली आहे. २०१९ मध्ये २३ हजार ५०३ घरे विकली जाण्याचा सर्वाधिक टप्पा ओलांडला गेला. ही उलाढाल दहा हजार कोटींपर्यंतची आहे. तर, २०२० मध्ये देखील २२ हजार ५७८ घरांची विक्री आणि १० हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तसेच २०२१ मध्ये अवघ्या आठ महिन्यांत २०हजार ३८१ घरे विकली आणि ९१०० कोटी उलाढाल झाली.

हेही वाचा: वाकड : १४४ वाहनांना १ लाख ३५ हजार दंड आकारला

सर्वाधिक विक्री या परिसरात

हिंजवडी, वाकड, चिखली, मोशी या परिसरात विक्री वेगाने आहे. घरांची विक्री आणि किमती पाहता पिंपरी-चिंचवड शहर सर्वाधिक मोठी बाजारपेठ ठरत आहे. शहरातील एकूण विक्रीपैकी या भागात ४० टक्के इतकी विक्री होत आहे. मागील पाच वर्षांत ताथवडे, डुडुळगाव, पुनावळे या भागात सर्वाधिक वेगाने विक्रीत वाढ झाली आहे. ताथवडेमध्ये ही वाढ चार पटीने, डुडुळगाव आणि पुनावळेमध्ये २ ते २.५ पटीने वाढ झाली आहे.

आकडे बोलतात

वर्ष घरांची विक्री (प्रती युनिट) आर्थिक उलाढाल (कोटी)

२०१७ १६,९८३ ७,३३०

२०१८ २१, ७४७ ९,६८०

२०१९ २३, ५०३ १०,११२

२०२० २२,५७८ १०,०२४

२०२१ २०, ३८१ ९,१००

(जानेवारी ते ऑगस्टपर्यंत)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top