उघड्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड
उघड्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड

उघड्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड

sakal_logo
By

शहरातील मोकळे भूखंड
स्वच्छ करण्याचे आदेश
पिंपरी, ता. ७ ः शहरातील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांवर काही नागरिक, संस्था, कंपन्यांकडून कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले आहे. शहरातील सर्व मोकळे प्लॉट्स व भूखंडांवर असलेला राडारोडा, कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याचा आदेश संबंधितांना दिला आहे. या पुढे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर पाचशे रुपये आणि मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास पाच हजार ते २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल. मोकळे भूखंड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जागा मालकांची असेल. कचरा व अस्वच्छता आढळल्यास जागा मालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top