घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी, ता. १० : दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने, दोन लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार बावधन येथे घडला.
याप्रकरणी प्रियदर्शनी आनंदराव वाडकर (रा. रामानंद क्लासिक बी बिल्डिंग, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरटा दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात शिरला. घरातील ४८ हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या व कानातील टॉप्स, ९२ हजारांचे तीन मंगळसूत्र, ४२ हजारांच्या दोन सोनसाखळी व आठ हजारांची रोकड असा एकूण एक लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com