शहरात आज ४७ केंद्रांवर लसीकरण

शहरात आज ४७ केंद्रांवर लसीकरण

पिंपरी, ता. १० ः कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंगळवारी (ता. ११) ४७ केंद्रांवर महापालिकेतर्फे केले जाणार आहे. त्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचे १८ हजार ५०० आणि कोव्हॅक्सिनचे तीन हजार ५०० असे २२ हजार डोस उपलब्ध आहेत. ते देण्याची व्यवस्था अनुक्रमे ३७ व १० केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.
कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत.
कोव्हॅक्सिन लस कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, लांडगे नाट्यगृह भोसरी, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे. प्रत्येकी २० टक्के डोस कोविन ॲपद्वारे स्लॉट बुकिंग केलेल्यांना व ८० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिले जाणार आहेत. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल.

गर्भवतींसाठी व्यवस्था
स्तनदा माता व गर्भवतींसाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम रुग्णालय ओपीडी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

ज्येष्ठांना प्रिकॉशन डोस
हेल्थ केअस वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा व्याधी असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. मात्र, दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत. अगोदर घेतलेल्या कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीचाच प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. ते देण्याची व्यवस्था अनुक्रमे ३७ व १० केंद्रांवर केली आहे.

मुलांना २४ केंद्रांवर लस
शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना २४ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. त्यासाठी १२ हजार ७५० डोस राखीव ठेवले आहेत. कोविन ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्यांसाठी ५० टक्के आणि ऑन दि स्पॉट नोंदणी करणाऱ्यांसाठी ५० टक्के डोस राखीव आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com