भाजी मंडईमधील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

भाजी मंडईमधील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पिंपरी, ता. १० ः महापालिका प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्या पिंपरी भाजी मंडईमधील व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतीच भाजी मंडईमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या, १४ व्यावसायिक व नागरिकांकडून प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड आकारला आहे.
पिंपरी कॅम्प भाजीमंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक भाजी खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यात नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मास्क व सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी केली असता, त्यांना भाजी मंडईतील १४ व्यापारी व नागरिक मास्क न लावता भाजीविक्री व खरेदी करताना दिसून आले. त्यामुळे विक्रेत्यांकडून ५०० रुपयांचा दंड आकारला आहे. एकूण ७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरोग्य निरीक्षक योगेश फले तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com