प्रजासत्ताक दिन बातम्या जोड

प्रजासत्ताक दिन बातम्या जोड

राजकीय पक्षांच्या कार्यालयात उत्साह


भारतीय जनता पक्ष कार्यालय

पिंपरी-चिंचवड भाजपाच्यावतीने मोरवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, सुप्रिया चांदगुडे, सूर्यकांत गोफणे, महादेव कवितके, वैशाली खाड्ये, देवदत्त लांडे, राजेंद्र ढवळे, निखिल काळकूटे, संजय पटनी, संजय परळीकर, नीलम हुले, कैलास सानप, तेजस्विनी कदम, हेमंत देवकुळे, किरण पाटील आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस
प्रजासत्ताक दिनानिमित्त खराळवाडी पिंपरी येथे डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. सामूहिकरीत्या प्रस्ताविकेचे वाचन केले. डॉ. कैलास कदम, कविचंद भाट, नरेंद्र बनसोडे, सायली नढे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नेते राजाभाऊ भोंडवे, हिरा जाधव, सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर आदी उपस्थित होते. स्वागत माऊली मलशेट्टी, सूत्रसंचालन वीरेंद्र गायकवाड आणि आभार प्रा. किरण खोजेकर यांनी मानले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे ध्वजवंदन केले. मनसे कर्मचारी कामगार सेना यांच्यावतीने ८० शाखा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्र ध्वजाला मानवंदना देण्यात आली. सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम आदमी पक्ष
आकुर्डीमध्ये आम आदमी पक्षातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा झाला. साई हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आपचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, प्रकाश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राज चाकणे यांनी केले.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com