ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण

ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात ओमिक्रॉनचे ५ नवीन रुग्ण

पिंपरी, ता. ८ ः शहरात ओमिक्रॉनचे पाच नवीन रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी चार पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण रँन्डम तपासणीत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. एकूण ८८ कोविड- १९ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ६३ रुग्णांची पुन्हा दहाव्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली. असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असून या रुग्णांना घरी सोडून गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू असल्याचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. शहरामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे देखील क्षेत्रिय कार्यालयस्तरावर सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत ४६ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली. त्यातील ३२ जण संसर्गमुक्त झाले. तर, १४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com