प्रयास युथ फाउंडेशनच्यावतीने चादरींचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रयास युथ फाउंडेशनच्यावतीने चादरींचे वाटप
प्रयास युथ फाउंडेशनच्यावतीने चादरींचे वाटप

प्रयास युथ फाउंडेशनच्यावतीने चादरींचे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : निगडी येथील प्रयास युथ फाउंडेशनच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये बेघर लोकांना गरम चादरींचे वाटप करण्यात आले. पुण्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यामुळे फुटपाथवर व पुलाखाली आसरा घेतलेल्या, बेघर लोकांचे खूप हाल होत आहेत. त्यात, लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. बेघर व अनाथांसाठी कायम कार्यरत असणाऱ्या, प्रयास युथ फाउंडेशनतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. शिवाजीनगर, औंध, वाकड, खडकी, कासारवाडी, पिंपरी, निगडी, देहूरोड आणि आळंदी या परिसरामध्ये चादरींचे वाटप करण्यात आले. डिसेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत शेकडो चादरी वाटण्यात आल्या. या उपक्रमाला लॉजिक मॉनिटर या कंपनीकडून ५०० चादरींची मदत करण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top