महिलांची ऑनलाईन गर्भसंस्कार प्रशिक्षणाला पसंती

महिलांची ऑनलाईन गर्भसंस्कार प्रशिक्षणाला पसंती

Published on

ऑनलाइन गर्भसंस्कार प्रशिक्षणाला पसंती

शहरी भागातील नोकरदार महिलांकडून अधिक प्रतिसाद; कोरोना काळात वाढ

पिंपरी, ता. ११ : गर्भवती असताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशा वेळी घरात मार्गदर्शन करणारे कोणी नसेल, तर अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोरोना काळात विशेष करून शहरी भागातील नोकरदार महिलांकडून ऑनलाइन गर्भसंस्कार प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.

घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसते किंवा बाहेरगावी असतात, त्यांना काही कारणास्तव येणे शक्य नसते. अशा वेळी बऱ्याच महिला गर्भसंस्कार केंद्रांची मदत घेतात. परंतु आता हेच प्रशिक्षण गर्भवती महिलांना ऑनलाइनही उपलब्ध आहे. कोरोना काळामध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यात प्रसूती आधी व प्रसूतीनंतर कशी काळजी घ्यायची, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. पण हे ऑनलाइन प्रशिक्षण योग्य त्या पद्धतीने घेणेही गरजेचे आहे. Udemy सारख्या संकेतस्थळावर गर्भवती महिलांसाठी अनेक कोर्स देखील उपलब्ध आहे. या कोर्समध्ये महिलेचे दैनंदिन वेळापत्रक कसे असावे, तिने कोणती काळजी घ्यावी, स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी कसे ठेवावे, बाळाच्या वाढीसाठी काय करावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. विशेषतः शहरी भागातील महिला असे कोर्स करताना मोठ्या प्रमाणावर दिसतात.

‘‘मी प्रेग्नेंट असताना घरात काळजी घेणारे कोणी नव्हते. त्यातच कोरोनाचा काळ, म्हणून मी ऑनलाइन गर्भसंस्कारचा क्लास केला. ज्याची मला खूप मदत मिळाली. ज्यात वेगवेगळ्या ॲक्टिविटी होत्या, ज्यामुळे मानसिकदृष्ट्या आरोग्य कसे उत्तम ठेवावे, हे समजले.’’
- दीपाली वाळुंज, ऑनलाइन प्रशिक्षणार्थी

‘‘गर्भसंस्कार हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. प्रेम, आनंद, शांती, सुख यांची सुंदर अनुभूती आहे. ऑनलाइन असो वा ऑफलाइन तुमचा सक्रिय सहभाग हा त्यात महत्त्वाचा आहे. ऑनलाइन गर्भसंस्कार क्लासेसचा कोरोना काळात अनेक महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.’’
- डॉ. सुप्रिया गुगळे, स्त्रीरोग तज्ज्ञ

‘‘जर आपण ऑनलाइन मार्गदर्शन घेत असाल आणि त्यात जर विशेष करून योगाच प्रशिक्षण घेत असाल तर ते योग्य त्या पद्धतीने व स्वतःची काळजी घेऊन करावे. या काळात सतत आनंदी राहणे, योग्य तो पौष्टिक आहार घेणे हे आई व बाळाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते.’’
डॉ. मंजुश्री चिंदे, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

काय काळजी घ्याल
- शक्यतो मोबाईलऐवजी लॅपटॉपचा वापर करा
- मोबाईलवर क्लास करत असाल तर मोबाईल आणि तुमच्यात सुरक्षित अंतर ठेवा
- ऑनलाइन योगा करताना योग्य त्या पद्धतीनेच करा
- चुकीच्या स्टेप्स करणे टाळा
- पूर्ण खात्री नसल्यास किंवा काही समजत नसलेल्या गोष्टींचा डॉक्टरांकडून सल्ला घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com