गुंठेवारी नियमितीकरण
सरसकट करा ः ढोरे

गुंठेवारी नियमितीकरण सरसकट करा ः ढोरे

पिंपरी, ता. ११ ः महापौर उषा ढोरे यांनी, गुंठेवारी सोईस्कर होण्यासाठी तिच्या नियमात शिथिलता आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनधिकृत बांधकामांवर शास्तिकराचे ओझे लादले गेले. त्यावेळी राज्यातही राष्ट्रवादी व काँग्रेसचीच सत्ता होती. आता गुंठेवारी कायद्यानुसार बांधकाम नियमित करण्यासाठी शास्ती वगळून मिळकतकर भरणा करून घेण्याचा पालकमंत्र्यांचा आयुक्तांना आदेश म्हणजे शास्ती माफीबाबत जनतेच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचाच प्रकार आहे, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.
स्थायी समितीने याबाबत ठराव केलेला असताना फक्त श्रेयासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा केविलवाणा प्रकार यातून दिसून येतो. याउलट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांकडे सर्व शास्तीकर वगळून मिळकतकर घ्यावा, अशा प्रकारचा आदेश द्यावा, अशी मागणी करणे अपेक्षित होते. स्थायी समिती सभापती नितीन लांडगे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com