पिंपरी-चिंचवडमध्ये १७०६ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये १७०६ नवीन रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये १७०६ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये १७०६ नवीन रुग्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः कोरोना संसर्ग झालेले एक हजार ७०६ नवीन रुग्ण मंगळवारी (ता. ११) शहरात आढळले. आतापर्यंत दोन लाख ८७ हजार ९१९ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत दोन लाख ७६ हजार ११० जण बरे झाले असून चार हजार ५२७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०३ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सात हजार ६१० जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण आठ हजार १३ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३१ लाख १२ हजार ७९६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. ६४९ जणांनी प्रिकॉशन अर्थात बुस्टर डोस घेतला. आज एक हजार १३५ घरांतील तीन हजार ६८१ नागरिकांची तपासणी केली. सध्या ६६ मेजर व ३९९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top