गुणगौरव समारंभ अन् गुणवत्ता यादीत स्थान

गुणगौरव समारंभ अन् गुणवत्ता यादीत स्थान

पिंपरी ः हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स स्कूल (माध्यमिक विभाग) प्रशालेतील शिष्यवृतीप्राप्त विद्यार्थ्याचा ‘गुणगौरव समारंभ’ पार पडला. प्रशालेतील पाचवीतील पूजा यंदे हिला २९४ गुण प्राप्त झाले आहेत. तिचा शहरी विभागात ३५० वा क्रमांक आला आहे. सार्थक दिक्षीत ८ वी २२८ गुण शहरी विभागात ७५ वा क्रमांक, अभिषेक जवळकर इयता ८ वी १८८ गुण शहरी विभागात ३८० वा क्रमांक दोघांनी प्राप्त केले आहेत. शाळाप्रमुख एकनाथ बुरसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. विभाग प्रमुख विजया तरटे, मंगल साठे, विलास कुंडगर, श्वेता गायकवाड, सुलभा पाटील, रूपाली माने, संजीवनी बनसोडे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेचे कर्मचारी व पालक पंकज यंदे, जयंत दिक्षीत, पर्यवेक्षिका आशा बनसोडे, सुनीता पाटील उपस्थित होते. प्रशालेतील ई.आर.पी. विभाग प्रमुख अनिता खैरनार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले. शिक्षक प्रतिनिधी मुकेश पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कविता गायकवाड यांनी केले. उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर, मार्गदर्शक शिक्षक आश्विन ठाकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

‘मॉडर्न’चे १५ विद्यार्थी झळकले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेत मॉडर्न हायस्कूल, निगडी या प्रशालेतील एकूण १५ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले आहे. पाचवी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी समर्थ रायते, रणवीर डांगे, संस्कार पाटील, अभिषेक भताने, भूमी हारे, पूजा चाळक, कृष्णा रंदवे, आर्या जामदार तर आठवीच्या गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी प्रसाद सावंत, सुहानी केदार, प्रतीक दळवी, संकेत कांबळे, एकनाथ आगलावे, पुष्कराज कुलकर्णी, गायत्री केणे.या विद्यार्थ्यांना अर्चना उंडे, श्रीकृष्ण निकम, आशा कुंजीर, उमा बिर्जे, सुजाता ठोंबरे, अमोल नवलपुरे, साधना राऊत, मीना अधिकारी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शाळा समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे, प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी, प्राचार्य प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com