पिंपरीत ‘युवा संवाद’ कार्यक्रम ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत ‘युवा संवाद’
कार्यक्रम ऑनलाइन
पिंपरीत ‘युवा संवाद’ कार्यक्रम ऑनलाइन

पिंपरीत ‘युवा संवाद’ कार्यक्रम ऑनलाइन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्तपणे ऑनलाइन पद्धतीने ‘‘युवा संवाद’’ कार्यक्रम झाला.
किरण कोरे (आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता, लावणी सम्राट), अंकिता नगरकर( राष्ट्रीय पुरस्कार विजेती,शास्त्रज्ञ), विशाखा पालांडे (कोर्फबॉल, नेटबॉल, हँडबॉल ऑल इंडिया सिल्वर मेडललिस्ट), शुभम शेवटे (आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता, रोल बॉल) प्रमुख युवा पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य, डॉ. बी. जी. लोबो, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ज्ञानेश्वर चिमटे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून संवाद साधला. नगरकर हिने कशा पद्धतीने पेटंट मिळवले याबद्दलची सविस्तर माहिती दिली. कोरे यांनी आपल्या कलाविष्काराची माहिती दिली. युवकांनी आपल्या आवडीचे काम आणि त्यातच करिअर करावे, असा सल्ला विशाखा पालांडे हिने दिला. तर शुभम शेवते यांनी युवकांनी अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये तर त्याला सामोरे जावे, असे मत व्यक्त केले.
संयोजन पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी अक्षय बर्गे यांनी केले. तर ‘सकाळ यिन’चे जिल्हाध्यक्ष चेतन लिम्हण यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top