फळझाडे जोपासण्याची 
ग्रामस्थांनी घेतली शपथ

फळझाडे जोपासण्याची ग्रामस्थांनी घेतली शपथ

सोमाटणे, ता. ३० ः गहुंजे येथे भिकोबा बोडके यांनी आपल्या वडिलांच्या तेराव्यानिमित्त नातेवाईक व इतरांना फळझाडांचे वाटप केले. यावेळी फळझाडे जोपासण्याची शपथ गावकऱ्यांसह नातेवाइकांनी घेतली.
गेल्या चार वर्षापूर्वी तेराव्या दिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन त्यातून चांगल्या प्रतीचे फळझाडे घेऊन त्यांचे वाटप करण्याची प्रथा नितीन बोडके यांनी सुरू केली होती. या प्रथेचा गावकऱ्यांनी स्वीकार करून गावातील प्रत्येक तेराव्याला फळझाडे वाटण्याला सुरुवात केली होती. यावेळी सर्वांनी ही सर्व फळझाडे जोपासण्याची शपथ घेतली. गहुंजे गावाने सुरू केलेल्या फळझाडे वाटप या प्रथेचे अनुकरण मावळातील सर्व गावांनी करावे, असे आवाहन नितीन बोडके यांनी केले.


PNE22S39137

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com