शहरासाठी जनतेचा जाहीरनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरासाठी जनतेचा जाहीरनामा
शहरासाठी जनतेचा जाहीरनामा

शहरासाठी जनतेचा जाहीरनामा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः निवडणूक आली की राजकीय पक्ष व उमेदवारांकडून मतदारांना आश्वासने दिली जातात. रस्ते करू, पाणी व वीजसमस्या सोडवू. याच विषयांवर बहुतांश वेळा प्रत्येक पक्ष निवडणूक लढवतो. नागरिकही त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. मतदान करतात. त्यातून काही कारभारी बनतात. पुन्हा पाच वर्षांनी हीच आश्वासने, हेच प्रचाराचे मुद्दे आणि पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण होते. पण, आता पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमने (पीसीसीएफ) सुमारे ४० स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) एकत्र घेऊन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चळवळ उभी केली आहे. त्यात सहभागी होऊन एक गुगुल फॉर्म भरायचा आहे. त्यात आपल्याला अपेक्षित शहरातील विकासकामे, सूचना द्यायच्या आहेत. त्यावर आधारित जनतेचा जाहीरनामा तयार करून सर्व पक्षांना दिला जाणार आहे.
पीसीसीएफने गेल्या पाच निवडणुकींमध्ये जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विधानसभा व लोकसभेच्या प्रत्येकी दोन आणि महापालिकेच्या एका निवडणुकीचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना केलेल्या सूचनांचा समावेश करून, स्वतंत्रपणे जनतेचा जाहीरनामा तयार करून प्रत्येक राजकीय पक्षाला त्या-त्या वेळी दिला आहे.
त्याबाबत फोरमचे तुषार शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना घेतो. त्यांचे संकलन करतो व त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून राजकीय पक्षांना देतो. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीही जाहीरनामा तयार केला जाणार आहे. आता शहरात मेट्रो आहे. स्मार्ट सटी प्रकल्पात समावेश आहे. पण, काही पायाभूत गोष्टींबाबत अडखळतो आहोत. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी गुगल फॉर्म तयार केला आहे. त्यात केवळ रस्ते, वीज, पाणी इतकेच नव्हे तह जवळपास २५ प्रकारचे विभाग आहेत. त्यानुसार नागरिकांनी सूचना सांगायच्या आहेत. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हायचे आहे.’’

इथे आहे गुगल फॉर्म
पीसीसीएफने नागरिकांच्या सहभागासाठी गुगल फॉर्म तयार केला आहे. तो https://surveyheart.com/form/61da70b728821d18acb09cff या लिंकवर उपलब्ध आहे. त्यात सहा प्रकारचे प्रश्न आहेत. पहिले तीन प्रश्न आपले नाव, संपर्क क्रमांक आणि पिन कोड क्रमांक द्यायचा आहे. नंतरच्या तीन प्रश्नांत शहराशी निगडित सूचनांबाबत आहेत. त्यात ‘तुमची सूचना कोणत्या क्षेत्रासाठी आहे?’, ‘वॉर्ड किंवा प्रभाग सीमित सूचना असाव्या, राज्य किंवा राष्ट्रीय सूचना नसावी’, ‘व्यापक सूचना असल्यास’ असे लिहून फॉर्म ‘सबमिट’ करायचा आहे.

प्रत्येक वेळी निवडणुकीचे मुद्दे रस्ते, पाणी, वीज हेच असतात. कोणताही राजकीय पक्ष याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत असतो. मागच्या वेळी तर पेव्हिंग ब्लॉकच्या मुद्द्यावरसुद्धा निवडणूक लढवली गेली आहे. पण, आता त्या उमेदवाराची आयक्यू लेव्हल, त्याची क्रियाशीलता बघायला हवी. त्यानुसार मतदान केले तरच, लोकशाहीत बदल होईल.
- तुषार शिंदे, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरम

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top