घरोघरी भोगीचा सण साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरोघरी भोगीचा सण साजरा
घरोघरी भोगीचा सण साजरा

घरोघरी भोगीचा सण साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : संक्रांतीच्या आधी एक दिवस (ता. १३) गुरुवारी साजरा होणारा सण म्हणजे भोगी. या दिवशी महिलांनी भोगीची भाजी व बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जाते. आरोग्यासाठी मिक्स भाज्या थंडीत आरोग्यास लाभदायी असल्याने अनेकजण आवडीने या भाज्या खातात. गृहिणींनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने नैवेद्य घरातील देवी देवतांना व मंदिरात देवून हा सण साजरा केला.

ओला वटाणा, हरभरा, घेवडा, गाजर, वांगे, तसेच इतर भाज्यांचे मिश्रण करून भोगीची भाजी बनविली. प्रादेशिक बदलानुसार प्रत्येक ठिकाणी या भाज्यांची नावे वेगळी आहेत. याला कोणी खेंगाट, खेंदाट, भोगीची भाजी, मिक्स भाजी, अशी विविध प्रकारची नावे आहेत. यामध्ये देखील महिला विविध रेसिपी बनविण्याचा प्रयत्न करतात. दिवसभरात लहान मुलांसह, ज्येष्ठ मंडळी व नोकरदार वर्गांनेही भोगीच्या भाजीचा आस्वाद घेतला. त्यासोबत अनेक जणांनी वांग्याचे भरीत, लोणी किंवा दही, पापड अशा लज्जतदार जेवणाचा आस्वाद घेतला. काही भाज्या महाग असूनही तरीही घरोघरी गृहिणींनी सण साजरा केला. काही शेजार मंडळींनी आवर्जून एकमेकांना भोगीची भाजी दिली. काहींनी भोजनासाठी एकमेकांना आमंत्रित केले. सकाळी देखील हातगाडीवर मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी आल्या होत्या. तेव्हाही महिलांनी भाज्या खरेदी केल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top