पुणे महापालिकेकडून १२५ बेवारस वाहने जप्त
पुणे, ता. १५ : महिनोनमहिने रस्त्यात धूळखात पडून असलेल्या एक हजारपेक्षा जास्त वाहनांवर गाडी काढून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या आतापर्यंत सव्वाशे गाड्या महापालिकेने जप्त केल्या आहेत.
शहरातील वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक नागरिक त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात पण महिनोनमहिने त्यांचा वापर करत नाहीत. या गाड्या रस्ता, पादचारी मार्गावर धूळखात पडून आहेत. महापालिकेच्या कामांना तसेच स्वच्छतेला यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंचतारांकित मानांकनासाठी तयारी सुरू आहे. पण या रस्त्यातील गाड्या त्यास मोठा अडथळा ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यांवर पडून असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत पालिकेकडून सुमारे १ हजार १२१ वाहनांच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. ज्या वाहनांच्या मालकांचा शोध लागत आहे, त्यांच्या पत्त्यावर नोटिसा पाठविण्यात येत आहेत. तर उर्वरीत वाहनांवर नोटिसा चिटकविण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत वाहन हटवले नाही, तर अशी वाहने जप्त केली जात आहेत. महापालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या मालकांची
१२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.