पिंपरी स्मार्ट सिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी स्मार्ट सिटी
पिंपरी स्मार्ट सिटी

पिंपरी स्मार्ट सिटी

sakal_logo
By

‘ओपन डेटा चॅलेंज’अंतर्गत
विविध स्पर्धांचे आयोजन

आयुक्तांची माहिती; स्मार्ट सिटीचा उपक्रम

पिंपरी, ता. १४ ः आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे सोमवार (ता. १७) ते शुक्रवार (ता. २१) या कालावधीत १०० स्मार्ट शहरांमध्ये ओपन डेटा सप्ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्त महापालिका, स्मार्ट सिटी, इनोव्हेशन- इनक्युबेशन व एंटरप्राईज सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ सप्ताह आयोजित केला असून विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अध‍िकारी राजेश पाटील यांनी केले आहे. ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा होणार आहेत. त्यात ब्लॉग लेखन स्पर्धा (प्रथम बक्षीस पाच हजार, द्वितीय तीन व तृतीय दोन हजार रुपये), आर्टिकल व डेटा स्टोरेज लेखन स्पर्धा (प्रथम १५ हजार, द्वितीय १० हजार व तृतीय पाच हजार रुपये), हॅकेथॉन स्पर्धा (प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार रुपये) असतील.

असा घ्या सहभाग
‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ संदर्भात ब्लॉग, व्हिडिओ तयार करून १९ जानेवारीपर्यंत संस्था व नागरिकांना स्पर्धेत‍ सहभागी होता येणार आहे. स्पर्धेची संपूर्ण माहिती, नियम व अटी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप आणि https://pcmcsmartsarathi.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top