पोलिसांसाठी शारीरिक तंदुरुस्ती स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांसाठी शारीरिक तंदुरुस्ती स्पर्धेचे आयोजन
पोलिसांसाठी शारीरिक तंदुरुस्ती स्पर्धेचे आयोजन

पोलिसांसाठी शारीरिक तंदुरुस्ती स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते २७ एप्रिल या कालावधीत होणारी स्पर्धा चार प्रकारात घेतली जाणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.
धावणे, सायकलिंग, चालणे व शरीरातील चरबी कमी करणे, अशा चार प्रकारात ही स्पर्धा असून ६० दिवसांचा कालावधी असेल. धावण्याच्या स्पर्धेतील पहिल्या विभागात तीनशे किलोमीटर तर दुसऱ्या विभागात दोनशे किलोमीटर धावायचे असून यामध्ये पुरुष व महिला भाग घेऊ शकतील. तर तिसऱ्या विभागात शंभर किलोमीटर धावणे असून केवळ चाळीस वर्षांवरील महिला भाग घेऊ शकतील.
तर सायकलींग स्पर्धेच्या पहिल्या विभागात एक हजार किलोमीटर तर दुसऱ्या विभागात पाचशे किलोमीटर सायकलिंग करायचे असून यामध्ये पुरुष व महिला भाग घेऊ शकतील.
तर तिसऱ्या विभागात चारशे किलोमीटर सायकलिंग असून केवळ चाळीस वर्षांवरील महिला भाग घेऊ शकतील.
चालण्याच्या स्पर्धेतील पहिल्या विभागात दररोज दहा हजार पावले चालायची असून यामध्ये महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. तर दुसऱ्या विभागात दररोज सात हजार पावले चालायची असून यामध्ये ४५ वर्षांवरील पुरुष-महिलांना सहभागी होता येईल. तर शरीरातील चरबी कमी करण्याच्या स्पर्धेत साठ दिवसात पाच, तीन व दोन टक्के चरबी करणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.
पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यात शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागृती व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीचे अर्जही जमा करून घेतले जात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top