ओमिक्रॉनचे १५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमिक्रॉनचे १५ नवीन रुग्ण
ओमिक्रॉनचे १५ नवीन रुग्ण

ओमिक्रॉनचे १५ नवीन रुग्ण

sakal_logo
By

शहरात दिवसभरात
ओमिक्रॉनचे १५ रूग्ण

पिंपरी, ता. ९ ः ओमिक्रॉन संसर्ग झालेले १५ नवीन रुग्ण रविवारी शहरात आढळले. त्यात पाच पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. यातील दहा जण परदेशातून आलेले असून, त्यांच्या संपर्कातील पाच जणांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयांत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रविवारी आढळलेल्या १५ रुग्णांपैकी चार जण कॅनडा व तीन जण अमेरिकेतून आले आहेत. मालदीव, दुबई व माली येथून आलेल्या प्रत्येकी एक प्रवाशाचा समावेश आहे. दरम्यान, परदेशातून आलेले ५७ व त्यांच्या संपर्कातील ३४ अशा ९१ जणांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातील ६१ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे. त्यात परदेशातून आलेले ३१ व त्यांच्या संपर्कातील १६ जणांचा समावेश आहे. १४ जण रॅंडम तपासणीत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील ३३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. तसेच, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ९१ पैकी ६४ रुग्णांची दहा दिवसांच्या उपचारानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून गृहविलगीकरणात ठेवले आहे. परदेशातून आलेल्या व त्यांच्या संपर्कातील उर्वरित नागरिकांची तपासणी सुरू असल्याचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी कळविले आहे.

परदेशातून आलेले व संपर्कातील व्यक्ती
एकूण तपासणी ः १८७९
प्राप्त अहवाल ः १८२४
प्रतीक्षेत ः ५५
निगेटिव्ह ः १७३३
पॉझिटिव्ह ः ९१
---

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top