आठवणीतील बजाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवणीतील बजाज
आठवणीतील बजाज

आठवणीतील बजाज

sakal_logo
By

अन्‌ बक्षिस समारंभाची
आतुरतेने वाट पहायचो.

- वसंत ठोंबरे, माजी क्रीडा अधिकारी, बजाज ऑटो

स्पोर्ट्स फंक्शनच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला बऱ्याच वेळा बजाजसाहेब प्रमुख पाहुणे असायचे. ज्या खेळाडूंनी बजाज ऑटोची शान व मान खेळामध्ये वाढविली. अशा खेळाडूंसाठी दरवर्षी बक्षीस वितरण समारंभ हा कार्पोरेट बिल्डिंगच्या हॉलमध्ये व्हायचा. एकदा २७० बक्षिसांचे वितरण करायचे होते. ते नेहमी टाईम, टॅलेंट अँड टेक्नॉलॉजी या तीन ‘टी’चा विचार करायचे. वेळेच्या बाबत नेहमी सतर्क असायचे. ब्रिगेडियर र. वी. जठार यांनी दोन तासांचे टाईमटेबल सहित प्लॅनिंग करून त्यांना एक कॉपी माहितीसाठी पाठवली होती. बजाज साहेब आले, ‘कार्यक्रम दोन तासांत होणार नाही,’ असे त्यांनी सूचवले. मी माझ्या वाक्यावर ठाम होतो. पारितोषिक वितरण समारंभ नियोजित वेळेच्या पाच मिनिटे अगोदर संपला. बजाजसाहेब माझ्या जवळ येऊन माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारून म्हणाले ‘जो खिलाडी आज नहीं आये. उन्हे बक्षीस मिलना चाहिये, और सबका हिसाब लिख के रखना, किसी का कम्प्लेंट आना नहीं चाहिये.’ अशा या व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर, समूहावर नेहमी पडत असे. त्यांचे नेतृत्व, वक्तृत्व व कर्तुत्व याबद्दल बजाज फॅमिलीच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. यामध्ये कोणतीही शंका नाही.
---

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top