मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी

मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी

पिंपरी, ता. २५ ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या प्रलंबित मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे शुक्रवारी केली. मसापचे शहराध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने बारणे यांची भेट घेऊन निवेदन केले. उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, श्रीकांत जोशी, डी. बी. शिंदे, राधाकृष्ण कुलकर्णी, रवींद्र झेंडे, सुहास घुमरे, श्रीपाद सटवे, विजय शेंडगे आदी उपस्थित होते. दोन वर्षापूर्वीही मसापने बारणे यांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. आज पुन्हा बारणे यांना निवेदन देण्यात आले. माझे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी बोलणे झाले असून मराठी भाषेला अभिजात दर्जेबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची घोषणा बाकी आहे. मसापच्या पाठपुराव्याला नक्की यश मिळेल, अशी आशा बारणे यांनी व्यक्त केल्याचे आणि विलंब होत असल्यास लोकसभेत पुन्हा आवाज उठवू, असे आश्वासन बारणे यांनी दिल्याचे लाखे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com