आरटीई मोहिमेला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई मोहिमेला सुरुवात
आरटीई मोहिमेला सुरुवात

आरटीई मोहिमेला सुरुवात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आर्थिक दुर्बल घटकांमधील पालकांना प्रवेशाचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी रक्षक सामाजिक संघ यांच्यातर्फे विनाशुल्क फॉर्म भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेला २४ फेब्रुवारीला सुरवात झाली आहे. पण दुर्बल घटकांतील पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे आणि योग्य ती माहिती नसल्यामुळे प्रवेश फॉर्म भरता येत नाही. ही अडचण लक्षात घेउन मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जमील औटी यांनी दिली. या मोहिमेत संघाचे सचिव जावेद वालीकर, उपाध्यक्ष प्रवीण परमानंद, नासीर औटी, रोहित धीवर, रॉन्सन बडीगर, वैभव पांडे, साहिल कोरगावकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top