Traffic Police
Traffic Police Sakal

‘गाडी एकाची आणि दंड दुसऱ्याला'

वाहतूक पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे कारवाई सुरू केल्यापासून ‘गाडी एकाची आणि दंड दुसऱ्याला' असे दिसून येणारे चित्र आताही कायम आहे.
Summary

वाहतूक पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे कारवाई सुरू केल्यापासून ‘गाडी एकाची आणि दंड दुसऱ्याला' असे दिसून येणारे चित्र आताही कायम आहे.

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे (CCTV Camera) कारवाई (Crime) सुरू केल्यापासून ‘गाडी एकाची आणि दंड दुसऱ्याला' असे दिसून येणारे चित्र आताही कायम आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. असाच मनस्ताप काळेवाडी-शांती कॉलनीतील रवींद्र दत्तात्रेय थेऊरकर यांना सहन करावा लागत आहे.

थेऊरकर यांना एमएच-१४ जीजे ७५५२ या गाडीवर सिग्नलला हेल्मेट घातलेले नसल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये ‘हेल्मेट’चा दंड गाडीच्या मालकाला असून, दुचाकी मात्र दुसऱ्याच कोणाची तरी असल्याचे ई-चलनाच्या वेबसाइटवर तपासले असता दिसून आले आहे. या गाडीच्या टिपलेल्या छायाचित्रात एक पुरुष चालक आहे. दरम्यान, ‘एमएच-१४ जीजे-७५५२’ या वाहनधारकाच्या गाडीचा रंग काळा आहे. जेव्हा वाहतूक पोलिसांनी संबंधित पकडले आहे. त्यावेळी २८ फेब्रुवारीला दुपारी घरी गाडी होती. तेव्हा ‘हेल्मेट’चा दंड भरण्याचा संदेश रवींद्र थेऊरकर यांना आल्यावर हा प्रकार समोर आला.

Traffic Police
गावागावात पोहोचलेली लालपरी हद्दपार करू नका, भविष्यात तुमच्या कुटुंबावर पश्चातापाची वेळ येईल

ऑनलाइन ई-चलनाची नोटीस बजावली आहे. त्यावर थेऊरकर यांनी फोटो दाखवा, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी तुमचाच फोटो आहे, असे सांगून दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वेबसाइटवर दंडाचा तपशील तपासला असता, ती गाडी दुसऱ्याचीच असल्याचे दिसून आले. त्यावरील व्यक्तीही दुसरीच असल्याचे सांगण्यात आले. असा वाहतूक पोलिसांकडून होत असलेला मनस्ताप कधी थांबणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अशी बजावली नोटीस

अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी थेऊरकर यांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले की, वाहतूक ई -चलनाची देय रक्कम आपण शक्य तितक्या लवकर ऑनलाइन पोर्टल व ‘MahaTrafficapp’ मोबाईल ॲप अथवा जवळच्या वाहतूक पोलिस विभागात जाऊन भरावी. अन्यथा हे प्रकरण दाखलपुर्व शनिवारी १२ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये पटलावर घेण्यात येईल. या नोटीसीसोबत जोडण्यात आलेल्या चलनामध्ये नमूद केल्याप्रमाणे तत्काळ अथवा लोक अदालतीच्‍या दिवसापूर्वी तडजोडीची रक्कम अदा केल्यास आपणास लोक अदालतमध्ये हजर राहण्‍याची आवश्‍यकता नाही.

येथे मागा दाद

‘ई-चलन’ मशिन किंवा ‘सीसीटीव्ही’द्वारे केलेली कारवाई मान्य नसलेले वाहनचालक न्यायालयात किंवा वाहतूक पोलिस शाखेच्या कार्यालयातील ‘मल्टिमीडिया सेल’च्या पोलिस निरीक्षकांकडे दाद मागू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com