ज्येष्ठांना आजपासून ‘प्रिकॉशन’ डोस

ज्येष्ठांना आजपासून ‘प्रिकॉशन’ डोस

पिंपरी, ता. ९ ः हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, साठ वर्षांवरील नागरिक आणि बीपी, मधुमेह, कर्करोग अशा सहव्याधी असलेल्या नागरिकांना सोमवारी व मंगळवारी प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. मात्र, त्यांनी लशीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले होते. त्या वेळी हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाइन वर्कर यांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस द्यायला सुरुवात झाली होती. या घेटनेला रविवारी (ता. १६) एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत सुमारे ३० लाख ७० हजार नागरिकांनी लस घेतली आहे. त्यातील दुसरा डोस घेऊन नऊ महिने अथवा ३९ आठवडे झालेले हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, ६० वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. त्याची व्यवस्था महापालिकेने ४९ केंद्रांवर केली आहे. त्यात कोव्हिशिल्ड ३९ व कोव्हॅक्सिन १० केंद्रांवर उपलब्ध आहे. प्रत्येक केंद्रांवर कोव्हिशिल्डचे पाचशे व कोव्हॅक्सिनचे साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत.

अशी करा नोंद
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यांना २८ दिवसांनी आणि कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. प्रिकॉशन डोस घेताना कोविन ॲपवर ऑनलाइन बुकिंग पद्धतीने २० टक्के आणि ऑन दि स्पॉट नोंदणी करून ८० टक्के डोस दिले जाणार आहेत. महापालिकेच्या किऑक्स टोकन प्रणालीने नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी कळविले आहे.

मुलांना आज २२ केंद्रांवर लस
शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस चार डिसेंबरपासून दिली जात आहे. सोमवारी (ता. १०) महापालिकेने २२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली आहे. २० केंद्रावर प्रत्येकी पाचशे, प्रेमलोक पार्क केंद्रावर ७५० आणि नवीन थेरगाव रुग्णालय केंद्रावर एक हजार असे सात हजार ८५० डोस उपलब्ध आहेत. कोविन ॲपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग आणि ऑन दि स्पॉट बुकिंग करूनही मुलांना लस घेता येणार आहे. दोन्ही पद्धतीसाठी प्रत्येकी ५० टक्के डोस राखीव ठेवले आहेत.
इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर चिंचवड स्टेशन, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, प्रेमलोक पार्क दवाखाना पुनावळे, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, हनुमंतराव भोसले दवाखाना क्रांती चौक नेहरूनगर, महापालिका कन्या शाळा चिखली, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, जुने भोसरी रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा चऱ्होली, काळभोर गोठा उर्दू शाळा यमुनानगर रुग्णालयाजवळ निगडी, प्राथमिक शाळा क्रमांक ९२ मोरेवस्ती चिखली, भानसे स्कूल यमुनानगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीगाव, कासारवाडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर शाळा जुनी सांगवी, दापोडी दवाखाना या केंद्रांवर सोमवारी मुलांना लस दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com