चिंचवडमध्ये एकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये एकाचा खून
चिंचवडमध्ये एकाचा खून

चिंचवडमध्ये एकाचा खून

sakal_logo
By

चिंचवडमध्ये एकाचा खून

पिंपरी, ता. ६ : फोन करून बोलावून घेत एकाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली.
ज्ञानदेव श्रीरंग साठे (रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहिणी गोकूळ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. ५) रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांचे मामा साठे यांना फोन करून त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर धारदार हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर व हातावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सोमवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास चिंचवडमधील मोकळ्या जागेत सापडला. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top