महिलेला मारहाण करून घराबाहेर काढत बुल्डोजरने पाडले घर

महिलेला मारहाण करून घराबाहेर काढत बुल्डोजरने पाडले घर

महिलेले शिवीगाळ करुन मारहाण
पिंपरी, ता. १० : महिलेला धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर घराबाहेर काढून घर पाडले. हा प्रकार बोपखेल येथे घडला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अनिता नंदकिशोर बिलोरीये (रा. रामनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियांका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (सर्व रा. बोपखेल) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या घरी असताना आरोपी त्यांच्या घरात शिरले. ‘तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हल्पमेंटला दिली असून त्याबाबतचे पॉवर ऑफ अटर्नीटीवर गुपचूप सही कर नाहीतर तुला जाळून टाक’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी सही करण्यास नकार दिला असता आरोपी अमित याने किचनमधील गॅस शेगडी फिर्यादी यांच्या अंगावर फेकून मारली. त्यावेळी नीलेश व विवेक यांनी फिर्यादीला पकडून ठेवले तर सनी, प्रियंका व सोनू यांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करून घराच्या बाहेर काढले. त्यानंतर सोबत आणलेल्या बुलडोजरने फिर्यादी यांचे घर पाडले. त्यावेळी प्रतीक्षा घुले हिच्या सांगण्यावरून आरोपी हे भांडण करून घर पाडत होते. दरम्यान, फिर्यादी यांचा मुलगा अक्षय याने बुलडोजर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला शिवीगाळ करीत हाताने व विटा मारून जखमी केले. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com